माकडहाडाचे दुखणे

जानेवारी महिन्यात एका मित्राच्या नवीन बंगल्याची वास्तुशांत होती. दवाखाना असल्याने जरा उशिराच पोहोचलो होतो त्यामुळे अगदी शेवटच्या पंगतीला आमचा नंबर लागला होता. अगदी घरातल्या लोकांनीही जेवायला घेतले होते. आशिष आणि अमृता इतका उशीर होऊनही तितक्याच उत्साहात, आदर्श यजमानाप्रमाणे सर्वांची विचारपूस करत होते. आशिष अधून मधून बसत होता पण अमृताच्या चेहऱ्यावर थकवा दिसत असला तरी ती बसायचे नाव घेत नव्हतीमी सहज विचारले, “यापुढे मी बघतो काय हवे नको ते पण तू बस जरावेळथकली असशील!”

अरे अजून चार तास उभे रहा असे म्हणलास तरी चालेल पण बसायचे नाव नको बाबा काढूअमृता त्रासून म्हणाली.

का गं ?”

अरे दिवाळीत पाय घसरून पायऱ्यांवरून धडपडलेबाकी काही लागले नाही पण नेमका माकडहाडाला मार बसला. तेव्हापासून पाच मिनिटे जरी बसले तरी वेदना असह्य होतात. सर्व करून थकले पण व्यर्थ! आता डिप्रेशन यायची वेळ आलीय.”

होमिओपथी ट्राय केलंस का ?” मीविचारले

तुझ्याकडे यासाठी औषध आहे ?” अमृताच्या चेहऱ्यावर आशा पल्लवित झाल्याने एकदमच ख़ुशी अवतरली

माकडहाड किंवा कॉक्सिक्स ही छोट्याछोट्या हाडांची एक साखळी आहे. हाडांचे शेपूटच म्हणा ना! पण त्याचा अगदीच काही उपयोग नाही असे मुळीच नाही बरं! बरेचसे स्नायू त्याला जोडलेले असतात व एकूणच आपल्या पाठीच्या कण्याचा तोल राखण्यातही त्याचा खारीचा वाटा असतोच!

माकडहाडाला मार लागल्याने, जोरात पार्श्वभागावर पडल्याने किंवा बरेचदा प्रसुतीच्या वेळी माकडहाड दुखावल्याने पाठीच्या कण्याच्या अगदी शेवटच्या भागात, बसण्याच्या जागेवर दुखणे सुरु होते. स्केटींग करताना पाय घसरून पडल्याने जोरात पार्श्वभागावर पडले जाते अशावेळी हमखास माकडहाड दुखावण्याचा संभव असतो, नाहीतर अमृतासारखे जिन्यावरून घसरून पडणे. वैद्यकीय भाषेत याला कॉक्सीडायनिया किंवा कॉक्सीगोडायनिया (coccydynia / coccygodynia) म्हणतात.  काही पेशंटमध्ये काहीच कारण सापडत नाही पण तरीही त्या ठिकाणी असह्य वेदना सुरु होतात अशा केसेसना idiopathic coccydynia म्हणले जाते.

लक्षणे :

जरावेळ बसले तरी बसण्याच्या जागेतून असह्य कळा येतात

त्याभागावरजरासुद्धादाबसहनहोतनाही

काहीवेळा मलविसर्जनकरतानादुखणेवाढते

सायकलिंग करणाऱ्यांना त्रास होण्याची शक्यता जास्त असते

दुखावलेल्या जागी असह्य कळा येतात व थोडावेळ सुद्धा बसणे मुश्किल होते. अशावेळी तात्पुरता उपाय म्हणून रबरीगोलट्यूब फुगवून त्यात बसावे लागते जेणेकरून दुखरा भाग खुर्चीला टेकणार नाही. पण ती ट्यूब घेऊन सर्वत्र हिंडणे फारच अवघड जाते विशेषत: समारंभाला किंवा कामाच्या जागी सतत ती पिशवी बाळगावी लागते.

निदान:

माकडहाडाला फ्राक्चर झाले असेल किंवा हाडांची साखळी हलली असेल तर ते बरेचदा क्षकिरण चाचणीत दिसून येते. पण काहीवेळा मात्र एमआरआय चाचणी करण्याची गरज पडते. पण काही रुग्णांमध्ये यापैकी कशातच काही आढळत नाहीपण तरी दुखणे असतेच!

उपचार :

सर्वसाधारण उपचारात वेदनाशामक गोळ्यांचा वापर होतो व त्याचबरोबर बसताना मुद्दाम तयार केलेल्या कुशन चा वापर करावयास सांगितले जाते. पोट साफ ठेवणे गरजेचे असते कारण कुंथल्यामुळे बरेचदा दुखण्यात वाढ होण्याचा संभव असतो. मार लागला असेल तर बर्फाने शेकून बरे वाटते. पण बरेचदा हे सर्व उपचार तात्पुरता आराम देतातकायमस्वरूपी उपायासाठी सर्वात गुणकारी म्हणजे होमिओपथी!

होमिओपथिक उपचार:

होमिओपथिक उपचारांद्वारे आजवर हजारो रुग्ण या आजारातून कायमचे बरे झाले आहेत. पण हे उपचार तज्ञांकडून घेतलेले सर्वात फायद्याचे कारण होमिओपथीच्या तत्वानुसार प्रत्येक पेशंटला एकच औषध उपयोगी पडत नाहीतर त्या पेशंटची प्रकृती बघून, दुखापतीचे कारण व कोण कोणत्या गोष्टींनी दुखण्यात वाढ होते किंवा आराम पडतो याचा विचार करून मगच औषध ठरवावे लागते.

सर्वसाधारणपणे अर्निका, हायपेरीकम, युफोरबियम, सिलीका व बेलाडोना या औषधांपैकी एखादे गुणकारी ठरते पण याखेरीज अजून बरीच औषधे ही वेळप्रसंगी द्यावी लागतात. साधारणत: चार ते पाच महिन्यात दुखण्यात संपूर्ण आराम पडतो व सलग एकाजागी किंवा कठीण पृष्ठभागावर बसणे शक्य होते. फक्त उपचारात सलगता हवी.