“On the Children” by Khalil Gibran

Your children are not your children

They are the sons and daughters of life’s longing for itself

They come through you but not from you

And though they are with you yet they belong not to you

You may give them your love but not your thoughts

For they have their own thoughts

You may house their bodies but not their souls

For their souls dwell in the house of tomorrow

Which you cannot visit not even in your dreams

You may strive to be like them but seek not to make them like you

For life goes not backward nor tarries with yesterday

. . .

I could not resist the temptation to translate the core concept of the prose in Marathi…

भावानुवाद

कितीही गाजवा मालकी, तरीही आपली नसतात मुले

जगण्यालाच येते हुक्की पुन्हा जन्माला यायची,
आपली प्रजननशक्ती ही इतकीच पुरेशी लायकी,
बाहेर येताच त्यांना होते सगळे अवकाश खुले,
कितीही गाजवा मालकी, तरीही आपली नसतात मुले

आपल्या प्रेमाखाली रुजते मायेची आसक्ती
संस्कारीचमच्यात भरवितो थोटी विचारशक्ती
नाकारुनी या सर्वांवरती चढलेली ती पुटे,
कितीही गाजवा मालकी, तरीही आपली नसतात मुले

बांधतो घरट्याच्या नावाखाली आपण चारभिंती
आकांक्षांना तोलून त्यांच्या आपल्या निकषांवरती
स्वप्नांपुढती त्यांच्या ठरते आपले विश्वच थिटे,
कितीही गाजवा मालकी, तरीही आपली नसतात मुले

बदलहा एकच शाश्वत सत्य म्हणोनी राही
भूतासारखे भविष्य असणे कधीच होणे नाही
काळानुसार बदले तो फेऱ्यातून सहजी सुटे
कितीही गाजवा मालकी, तरीही आपली नसतात मुले